ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज
Konkan Railway | एलटीटी-करमळी रोज धावणाऱ्या विशेष गाडीचे आजपासून
रत्नागिरी : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोव्यातील करमळी दरम्यान सोमवारपासून सुरू होत असलेल्या विशेष गाडीचे आरक्षण आज दिनांक 21 डिसेंबरपासून खुले होत आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील सध्याची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये सोमवारपासून लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमळी अशी दैनंदिन विशेष गाडी सुरू होते आहे. या गाडीचे आरक्षण ऑनलाइन तसेच रेल्वेच्या संगणकीकृत आरक्षण खिडकीवर आजपासून सुरू झाले आहे.
दिनांक 1 जानेवारी 2025 पर्यंत या गाडीच्या एकूण 18 फेऱ्या होणार आहेत. ऐन हंगामाच्या काळात रेल्वेने विशेष गाड्यांचे नियोजन केल्याने कोकण रेल्वे मार्गावर कन्फर्म तिकीट न मिळालेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.