थर्टीफर्स्ट 2024 : उत्पादन शुल्क, पोलीस ,एफडीएने अलर्ट राहवे : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह
नार्को कोओर्डीनेशन जिल्हास्तरीय समितीची बैठक

रत्नागिरी : 31 डिसेंबरच्या अनुषंगाने उत्पादन शुल्क, पोलीस, एफडीए आदींनी विशेष
सतर्क रहावे. पर्यटनस्थळी, गर्दीच्या ठिकाणी अंमली पदार्थविरोधी कसून तपासणी करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
नार्को कोओर्डीनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आज झाली. बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, खेड प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप,
जिल्हा आरोग्य अधिकारी डाॕ अनिरुध्द आठल्ये, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, सहाय्यक आयुक्त दीपक घाटे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी विभागनिहाय सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, शाळा,
महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करुन, अहवाल सादर करावा. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी बंद असणाऱ्या कंपन्यांबाबत तपासणी करुन अहवाल
द्यावा. उत्पादन शुल्क, पोलीस विभाग, वन विभाग, उपविभागीय अधिकारी, बंदर अधिकारी यांनी हॉटेल, धाबे, बंद असणाऱ्या कंपन्या मेडिकल स्टोअर्स आदींबाबत तपासणी करावी. विशेषत: उद्या होणाऱ्या 31
डिसेंबरच्या अनुषंगाने आजपासूनच दक्ष रहावे. दिलेल्या वेळेत वाईन शॉप, रेस्टॉरंट बंद होतील याबाबत सजग रहावे, असे आवाहन त्यांनी केले.
पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी म्हणाले की, नेपाळी खलाशांमध्ये अंमली पदार्थांचा वापर होतो, त्यामध्येबंदर अधिकाऱ्यांनी दक्ष राहून तपासणी करावी. पोलीस विभागाला माहिती देऊन संयुक्त कारवाई करावी. 24 तास सुरु असणाऱ्या मेडिकल दुकानांबाबतही एफडीएने लक्ष ठेवावे. विशेषत: बंदी असणाऱ्या औषधांबाबत सतर्कता ठेवावी. पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी विषय वाचन करुन माहिती दिली.