महाराष्ट्रराजकीयलोकल न्यूज
विशेष सहाय्य योजनांचा लाभ ‘डीबीटी’द्वारे मिळणार!

- ‘संजय गांधी निराधार योजना’
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजने’चा समावेश
मुंबई : निराधारांना मिळणाऱ्या लाभाचा विलंब टाळण्यासाठी ‘संजय गांधी निराधार योजना’, ‘श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजने’च्या अर्थसाहाय्याचे वितरण थेट लाभआता हस्तांतरण (DBT) पोर्टलच्या माध्यमातून वर्ग केले जाणार आहे
ही प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे वरील योजनांचे अनुदान लाभार्थींना मिळण्यासाठी सध्या जो विलंब होत आहे, तो टाळू शकणार असल्याचे सांगण्यात आले.