नितेश पाटील यांची पिरकोन ग्रुप ग्रा. पं.च्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड

- जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी केले अभिनंदन
उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश गजानन पाटील यांची उरण तालुक्यातील पिरकोन ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी नितेश पाटील यांची पिरकोन ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे, रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष किरीट पाटील, उरण तालुका इंटक अध्यक्ष राजेंद्र भगत तसेच उरण पूर्व विभागातील असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसचे कट्टर, प्रामाणिक, एकनिष्ठ कार्यकर्ते व सामाजिक कार्य करणाऱ्या नितेश पाटील यांची पिरकोन ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी निवड झाल्याने सर्वच स्तरातून नितेश पाटील यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.