देवरुखमध्ये आमदार चषक जिल्हा मानांकन बँडमिंटन स्पर्धा १ व २ फेब्रुवारीला

देवरूख (सुरेश सप्रे ) : रत्नागिरी बँडमिंटन अससोसिएशनच्या मान्यतेने संगमेश्वर तालुका बँडमिंटन अससोसिएशन आयोजित कै बाळासाहेब पित्रे यांचे स्मरणार्थ जिल्हा मानांकन आमदार चषक बँडमिंटन स्पर्धा दि. १व २ फेब्रुवारीला देवरूख येथे संपन्न होणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत स्पर्धा प्रमुख मोहन हजारे व बास्टचे सचिव रविकांत कदम यांनी दिली.
तालुक्यात बँडमिंटन खेळाला चालना देणारे कै. बाळासाहेब पित्रे यांचे स्मरणार्थ याच्या स्मृतिप्रित्यर्थ स्पर्धा संगमेश्वर तालुका बँडमिंटन अससोसिएशनकडून घेतल्या जातात. यंदाची हि ५वी मानांकन स्पर्धा आमदार शेखर निकम यांनी पुरस्कृत केली आहे.
या स्पर्धा विविध गटात घेण्यात येणार आहेत यात ११ वर्षाखालील १३ वर्षाखालील १५ वर्षाखालील १७ वर्षाखालील १९ वर्षाखालील ४० वर्षावरील ५० वर्षावरील व खुली अशा गटात यात एकेरी. दुहेरी व मिश्र दुहेरी अशी खेळवली जाणार आहे.
या सर्व गटातील विजेत्यांना व उपविजेत्यांना रोख रक्कम व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. ही स्पर्धा सुलभाताई आपटे क्रीडा संकुलात देवरुख येथे होणार आहेत..
स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी आपली नावे दि. 28 डीसेंबरपर्यंत आँनलाईन www.mbasso.in या वेबसाईट वर करावी.