राजापूरमध्ये रांगोळी कार्यशाळा संपन्न

- राजापूर हायस्कुल येथे आयोजन
- रांगोळीकार चारुदत्त वैद्य यांची उपस्थिती
देवरुख : राजापूर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, राजापूर हायस्कूल , गोडे- दाते कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय यांच्या पुढाकाराने प्रथमच या शाळेच्या कलामंदिरात रांगोळी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यकारिणी सदस्य कार्यवाह जगदीश पवार , खजिनदार अनंत रानडे आणि कार्यकारिणी सदस्य शैलेश आंबेकर यांच्या विशेष प्रयत्नाने राजापूरमध्ये रांगोळी कार्यशाळेचा उपक्रम प्रथमच घेण्यात आला. यासाठी मुंबई येथील सुप्रसिद्ध रांगोळीकार, नेपथ्य कार , चित्रकार चारूदत्त अच्युत वैद्य, घाटकोपर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, ते मुंबई येथून रंग, ब्राऊन पेपर,मुलांसाठी चित्रे असे विविध साहित्य घेऊन आले होते. संस्थेने रांगोळी आणि सगळ्या खर्चाची जबाबदारी घेतली होती. त्यांनी रांगोळी काढण्या आधी चित्र कसे आणि कश्यावर काढावे, त्यासाठी कोणते रंग वापरावे, ते कसे तयार करावे, नंतर प्रत्यक्ष रांगोळी कशी काढावी याचे प्रात्यक्षिक दाखविले.
या कार्यशाळेला २७ मुले हजर होती. १९ मुलांनी स्वतः रांगोळी काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला त्यांनी त्याचा आनंद घेतला यामध्ये चारूदत्त वैद्य यांनी प्रत्येक मुलाजवळ जाऊन त्याच्या रांगोळी मध्ये कशी सुधारणा करता येईल ते सांगितले.
या दोन दिवसाच्या कार्यक्रमात श्रीमती दर्शना मांडवकर, कला शिक्षक रविंद्र घोसाळे, कला शिक्षक सचिन रावण, सुजित पारकर, सिद्धेश पारकर , कु. दिपिका पवार, कला शिक्षक गुरव ओणी, विलये येथील कला शिक्षक या शिक्षक वृंद यांनी मेहनत घेऊन हे शिबीर यशस्वी झाले. यानंतर मनोगत व्यक्त करताना वैद्य यांनी अशी शिबिरे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.