महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती
व्हेळ येथे १६ फेब्रुवारीला रोहिदास जयंती

लांजा (संतोष कदम) : तालुक्यातील व्हेळ रोहिदासवाडी, मोगरगाव, ग्रामपंचायत व्हेळ येथे १६ फेब्रुवारी रोजी संत रोहीदास महाराज जयंती साजरी करण्यात येणार आहे. व्हेळ येथे आयोजित करण्यात येणाऱ्या संत रोहीदास महाराज जयंतीचे यंदाचे २० वे वर्ष आहे.
यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ, दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विविध मान्यवरांचा सत्कार, महिला व पुरुषांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच रात्री बहुरंगी नमन कार्यक्रम होणार आहे.
या जयंती महोत्सवाला तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन उपशाखाप्रमुख व मंडळाचे सभासद, सदस्या लक्ष्मी दत्ताराम कदम, श्रावणी संतोष कदम, शिवसेना उबाठाचे उपशाखाप्रमुख संतोष दत्ताराम कदम यांनी केले आहे.