‘पीएम श्री’ स्कूल झरेवाडी येथे कोकण पर्यटन, पर्यावरणावर धीरज वाटेकर यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

रत्नागिरी : ‘पीएम स्कूल फॉर रायझिंग इंडिया’ (पीएम श्री) या केंद्र सरकारच्या योजनेत सहभागी असलेल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा झरेवाडी (रत्नागिरी) या शाळेत काल (२९ जानेवारी) दोन सत्रात ‘कोकण : पर्यावरण, पर्यटन व भविष्य’ या विषयावर चिपळूण येथील पर्यटन तथा पर्यावरण अभ्यासक धीरज वाटेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांचा उत्साह परिणामकारक होता.

या कार्यक्रमाला केंद्रप्रमुख विष्णू पवार, अपग्रेड मुख्याध्यापिका आशा बगाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ओंकार आचरेकर, उपाध्यक्ष विश्वनाथ कळंबटे, उपशिक्षक संतोष पेवेकर, रामनाथ बने, उपशिक्षिका सरिता आलिम, अपूर्वा काळोखे, पदवीधर शिक्षिका संजीवनी यादव, उपशिक्षिका मॅडम उपस्थित होते.
यावेळी सर्पमित्र अनिकेत चोपडे यांनीही विद्यार्थ्यांना ‘साप : समज व गैरसमज’ या विषयावर माहिती दिली. या कार्यक्रमासाठी आम्हाला शाळेचे पदवीधर शिक्षक, आमचे मित्र आणि प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक, लेखक व कलाकार राजेश गोसावी यांनी निमंत्रित केले होते.