महाराष्ट्रलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती
विघ्रवली येथे माघी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2025/01/IMG-20250131-WA0024-780x470.jpg)
संगमेश्वर : माघी गणेशोत्सवानिमित्त संगमेश्वर तालुक्यातील विघ्रवली माळवाडी येथे शनिवार १ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गणपती सेवा मंडळ विघ्रवली माळवाडी यांनी केले आहे.
मागे गणेशोत्सवानिमित्त सकाळी ९ ते ११ होम हवन. ११ ते १२ श्री गणेश अभिषेक , दुपारी १ ते २ सत्यनारायणाची महापूजा, दुपारी २ ते ३ महाप्रसाद, ३ ते ५ हळदी कुंकू, रात्री ९ ते १० विविध गुणदर्शन कार्यक्रम, रात्री १० वा. वरदान वाघजाई नमन नाट्य मंडळ माभळे जाधववाडी यांचे नमन. या सर्व कार्यक्रमांना भक्तगणांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.