रत्नागिरीत महिला वकिलांनी साजरा केला महिला दिन

- क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद, न्यायालयीन महिला कर्मचाऱ्यांचाही सहभाग
रत्नागिरी : रत्नागिरी बार असोसिएशनमार्फत महिला दिनाचे औचित्य साधून महिला वकील व न्यायालयीन महिला कर्मचारी यांच्या विविध स्पर्धा उत्साहात झाल्या. यानिमित्ताने महिला वकिलांनी जल्लोषात महिला दिन व आनंदोत्सव साजरा केला. क्रिकेट स्पर्धेचा सर्वच महिलांनी आनंद लुटला. तसेच उत्स्फूर्त भाषण स्पर्धा, चालणे, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम, रांगोळी, पाककृती या स्पर्धांमधून महिला वकिलांनी आपले कसब दाखवून दिले.
जिल्हा न्यायालयाच्या नवीन सभागृहामध्ये या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. या वेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी, मुख्य न्यायदंडाधिकारी निखिल गोसावी, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) संगिता वनकोरे, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे, महिला उपाध्यक्ष ॲड. सौ. शाल्मली आंबुलकर, सौ. निता गोसावी, सौ. नेत्रा गोसावी, दूर्वा गोसावी आदी उपस्थित होते. ११५ सहभागी महिलांना बक्षीस, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाबद्दल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी महिलांचे कौतुक करून अशाच प्रकारे कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना केली. ॲड. पाटणे यांनीही स्पर्धांच्या नेटक्या आयोजनाबद्दल कौतुक केले. याप्रसंगी ॲड. आंबुलकर यांनी सांगितले की, महिला वकिलांनी अधिकाधिक परिश्रम घेऊन न्यायाधीश पदापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे. रत्नागिरी वकिल संघटनेच्या जास्तीत जास्त महिला वकिलांनी न्यायाधीश होण्याचा मान मिळवल्यास, ती गोष्ट रत्नागिरी बार असोसिएशनसाठी भूषणावह ठरेल. महिला वकिलांनी न्यायाधीश होण्यासाठी त्यांना जी जी मदत लागेल त्याप्रमाणे मदत करण्यास रत्नागिरी बार असोसिएशन सदैव तत्पर असेल.
रत्नागिरी बार असोसिएनच्या उपाध्यक्षा ॲड. शाल्मली आंबुलकर यांच्या निटनेटक्या नियोजनातून महिला वकिल आणि न्यायालयीन महिला कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि एकमेकांमधील सबंध दृढ होण्याकरिता विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात व उत्साहात पार पाडल्या.
महिला वकील, न्यायालयीन महिला कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रत्नागिरी बार असोसिएनचे खजिनदार ॲड. अवधूत कळंबटे, माजी अध्यक्ष ॲड. दिलीप धारीया उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. मधुमती कदम आणि ॲड. लीना गुरव यांनी यांनी केले.
स्पर्धा, स्पर्धाप्रमुख आणि विजेते या क्रमाने
उत्स्फूर्त भाषण स्पर्धा- स्पर्धा प्रमुख ॲड. शबाना वस्ता, ॲड. मधुमती कदम. प्रथम क्रमांक ॲड. स्वप्ना चांदोरकर, द्वितीय ॲड. लीना गुरव, तृतीय ॲड. अनुष्का बापट. योग- स्पर्धा प्रमुख ॲड. रुची महाजनी, ॲड. नीलम शेवडे, विजेत्या ॲड. श्रद्धा ढेकणे, उपविजेत्या ॲड. सोनाली रहाटे. जलद गतीने चालणे- स्पर्धा प्रमुख ॲड. अंकिता शेलार, ॲड. नेहा नलावडे, विजेती ॲड. सुमन सुतक, उपविजेती ॲड. श्रद्धा कांबळे. बॅडमिंटन- स्पर्धा प्रमुख ॲड. प्रतीक्षा सावंत, ॲड. रती सहस्त्रबुद्धे, विजेती ॲड. गायत्री मांडवकर, उपविजेती ॲड. कोमल जोशी. कॅरम- स्पर्धा प्रमुख ॲड. ममता मुद्राळे, ॲड. लीना गुरव, विजेत्या ॲड. श्रद्धा ढेकणे व ॲड. सोनाली खेडेकर, उपविजेत्या ॲड. तृप्ती बसणकर व ॲड. श्रद्धा कांबळे. पाककला- स्पर्धा प्रमुख ॲड. गौरी शेवडे, ॲड. सोनाली रहाटे, शाकाहारी पदार्थ- विजेती ॲड. स्वाती शेडगे, उपविजेती अनुष्का बापट, मांसाहारी पदार्थ- विजेती संजना विलणकर, उपविजेती ॲड. धनश्री साळुंखे. रांगोळी- स्पर्धा प्रमुख ॲड. सिद्धी भोसले, ॲड. प्रिया चौगुले, प्रथम चैत्राली नागवेकर, द्वितीय रंजना झोरे, तृतीय श्वेता शिवगण, बुद्धिबळ- स्पर्धा प्रमुख ॲड. सरोज भाटकर, ॲड. स्वप्ना चांदोरकर, विजेती सुप्रिया कांबळे यादव, उपविजेती ॲड. श्रेया शिवलकर, क्रिकेट- विजेती टीम कॅप्टन ॲड. ममता मुद्राळे, उपविजेती टीम कॅप्टन ॲड. श्रद्धा ढेकणे, मालिकावीर ॲड. गायत्री मांडवकर.