Konkan Railway | रत्नागिरी-दादर विशेष गाडीची दुसरी फेरी रवाना

रत्नागिरी : होळीसाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी दादर ते रत्नागिरी मार्गावर सोडण्यात आलेल्या विशेष गाड्यांपैकी रत्नागिरी ते दादरसाठी विशेष गाडीची दुसरी फेरी आज पहाटे 4.30 वाजता रवाना झाली ही विशेष गाडी पूर्णपणे अनारक्षित आहे. सध्या रत्नागिरी ते दिवा मार्गावर धावणाऱ्या पॅसेंजर गाडी शिवाय खास होळीसाठी ही गाडी चालवली जात आहे.
होळीसाठी जाहीर करण्यात आलेल्या विशेष गाडी संदर्भात कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार ०११३१ दादर रत्नागिरी होळी विशेष गाडी ११, १३ व १६ मार्च, २०२५ दुपारी १४:५० ला सुटून रात्री २३:४० ला रत्नागिरीला पोहोचेल असे नियोजन करण्यात आले आहे.०११३२ रत्नागिरी दादर होळी विशेष गाडी १२, १४ आणि १७ मार्च, २०२५ पहाटे ४:३० ला सुटून दुपारी १३:२५ ला दादरला पोहोचेल, असे गाडीचे वेळापत्रक आहे. यानुसार रत्नागिरी ते दादर मार्गावरील होळीसाठीची आज दुसरी फेरी दादरसाठी रवाना झाली आहे.
डब्यांची रचना : एकूण डबे 16
सर्वसाधारण श्रेणी : 14 डबे
एसएलआर 2 डबे
विशेष गाडीचे थांबे : ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.