उरणमध्ये जनसुरक्षा कायद्या विरोधात माकपची मोर्चा काढून निदर्शने

उरण (विठ्ठल ममताबादे ) : राज्य सरकारने येत्या पावसाळी अधिवेशनात जनसुरक्षा कायदा आणण्याचे जाहीर केले आहे. हा कायदा जनतेच्या मूलभूत लोकशाही हक्कावर प्रतिबंध करणारा तसेच सरकारला हुकूमशाही कडे नेणारा आहे. त्यामुळे हा कायदा मागे घ्यावा, या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मंगळवारी उरण चार फाटा ते गांधी चौक असा मोर्चा काढून उरण शहरातील बाझारपेठ मधील गांधी चौकात निदर्शने करण्यात आली.
या मोर्चात सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विरोध करणारा हा कायदा मागे घ्या आशा घोषणा देत हा मोर्चा काढण्यात आला.यासाठी उरणमध्ये भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) पक्षाच्या वतीने गावोगावी जनजागृती करण्यात आली.
या विधेयका विरोधात राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे.राज्य सरकारच्या या कृतीचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जाहीर निषेध करत असून सरकारने हे विधेयक विनाविलंब मागे घ्यावेअशी मागणी निदर्शने करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यावेळी केली.