चिपळूणच्या सिद्धी मिरगावकर यांचे एमबीबीएसमध्ये यश

- मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव
चिपळूण : शहरातील बहादूरशेख येथील रहिवासी डॉ. सिद्धी संजय मिरगांवकर हिने हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेज आणि डॉ. आर. एन. कुपर हॉस्पिटल विलेपार्ले मुंबई येथे एम. बी. बी. एस. 2019 बॅचला प्रवेश घेऊन डॉक्टर झाली आहे. तिच्या या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ. सिद्धी मिरगांवकरचा दीक्षांत समारंभ दिनांक 05 एप्रिल 2025 रोजी मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले मुंबई येथे संपन्न झाला. या वेळी मेडिकल कॉलेजचे डीन व मान्यवरांच्या उपस्थितीत तिला पदवी प्रदान करून गौरव करण्यात आला.डॉ. सिद्धीचे 10 वी पर्यंत शिक्षण युनाइटेड इंग्लिश स्कूल चिपळूण येथे झाले असून पुढे पुणे येथे आबासाहेब गरवारे कॉलेज येथे 12 विज्ञान शाखा प्राविण्य मिळवून नीट परीक्षा देऊन HBT मेडिकल कॉलेज विलेपार्ले येथे MBBS पूर्ण करुन मेडिकल इंटर्नशिप पूर्ण केली व दि. 05 एप्रिल रोजी त्यांचा दीक्षांत (पदवीदान) समारंभ झाला. पदवीदान समारंभासाठी आई सौ. साधना मिरगांवकर, वडील सेवानिवृत्त नायब तहसीलदार श्री. संजय शंकर मिरगांवकर, आदित्य सचिन महाडिक यांच्यासह अनेक मान्यवर हजर होते. डॉ.सिधीच्या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आपण आपली सेवा प्रामाणिकपणे देऊन या क्षेत्रात चांगले काम करू असे डॉ. सिद्धी यांनी सांगून आपल्या यशाचे सारे श्रेय आपले आई, वडील, गुरुजन व हितचिंतकांना दिले आहेत.