काजरघाटीतील शेतकऱ्यांना एनिमल आऊट आणि फळमाशी रक्षक सापळ्याचे कृषी विभागाकडून वाटप

रत्नागिरी : शहरानजीक काजरघाटी येथे वानर आणि माकडांचा होणारा उपद्दव टाळण्यासाठी सिंधुरत्न योजनेतून कृषी विभाग रत्नागिरीच्या वतीने एनिमल आऊट फवारणी औषध आणि फळमाशी रक्षक सापळा यांच वाटप तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांच्या हस्ते करण्यात आले.
शेतक-यांना गेल्या काही वर्षापासून वानर आणि माकडांचा मोठा त्रास सहर करावा लागलाय या वानरांच्या उपद्रवामुळे पिकांच मोठ नुकसान होत आहे.यावर पर्यायी मार्ग म्हणून वानरांचा उपद्रव टाळण्यासाठी प्रशासनानं एनिमल आऊट हे फवारणी औषध शेतक-यांसाठी उपलब्ध करुन दिलय.सिंधुरत्न समृद्ध योजनेतून कृषी विभाग रत्नागिरी यांच्या वतीन हे औषध शेतक-यांना उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.हे औषध कोकण कृषी विद्यापीठ मान्यता प्राप्त आहे.काजरघाटीतील सर्व शेतक-यांना या औषधाचं मोफत वाटप करण्यात आलं. तसेच आंब्यावर फळमाशीचा मोठा त्रास होत असतो यामुळे पिकाचं नुकसान होत यासाठी शेतक-यांना फळमाशी रक्षक सापळ्याचं देखील वाटप करण्यात आलं.
पोमेंडी खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे , कृषी मंडल अधिकारी प्रदिप भुवड ,प्रभारी कृषी पर्यवेक्षक निलेश कांबळी , कृषी सहाय्यक पल्लवी काळे , पोलीस पाटील विणा पटवर्धन , कृषी सोसायची अध्यक्ष दिलीप पटवर्धन तसेत मोठ्या संख्येनं काजरघाटीतील शेतकरी उपस्थित होते.या कार्यक्रमाचं आयोजन काजरघाटीतील युवा शेतक-यांनी केलं होतं.