धकाधकीच्या जीवनात ‘एक दिवस नात्यासाठी’ अनोखा उपक्रम !
खेड तालुक्यातील कुरवळखेड येथे लाड कुटुंबीयांचा उपक्रम
संगमेश्वर : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला एकमेकांकडे जाणे आणि नाते समजून घेऊन ते जपणे खूपच अवघड झालेय. अशा स्थितीत नाते म्हणजे काय, प्रत्येक नातेवाईकाचं असणार नातं, नात्याचा परिचय, व त्याचं आनंदात व प्रसंगात महत्त्व किती? हे जाणून घेण्यासाठी धकाधकीच्या जीवनातून वेळ नसता नाही, ” एक दिवस नात्यासाठी” हा विचार मनात येऊन उदात्त हेतूने अनेक नातेवाईकांना एकत्र करण्याचं काम खेड तालुक्यातील कुरवळखेड या गावात संजय लाड व बंधु लाड यांनी नुकतेच केले होते.
सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले कुरवलखेड येथे या स्नेहमेळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. वरचेवर मैत्रीच्या संपर्कात जरूर रहा मनसोक्त पैसे व वेळ खर्च करा. आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेव्हा शेवट होईल तेव्हा येथील कोणतीही गोष्ट आपल्या सोबत नेता येणार नाही. आपला देह मातीत मिसळून जाईल , तेव्हा कुणी आपले कौतुक केले काय, टीका केली काय? जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशाचा आनंद घेतलाच पाहिजे. त्याप्रमाणे परंपरेप्रमाणे चालत आलेली नाती, जागी ठेवून टिकवली पाहिजेत. आपल्या कुटुंबाशी जोडलेल्या नातेवाईक कुटुंबाला एकत्र करण्याचा बेत व त्याप्रमाणे या भव्य कार्यक्रमाचे सुंदर नियोजनही केलं.
हास्य विनोद, गप्पागोष्टी, थोरांचे विचार व संस्कार, अनेक व्यक्तींचा परिचय, नात्याची जपणूक, आनंदातील सहभागाप्रमाणे दुःख गांभीर्याचे प्रसंग यासाठी सहभाग देऊन यापुढे लहान थोर मंडळींनी आपली नाती नक्की जतन करूया. व हाय हॅलो करून प्रतिसाद देण्याप्रमाणे वेळेनुसार प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन हरवत चाललेली नात्यातील आपुलकी, प्रेम, जिव्हाळा ,सुखदुःखं, इत्यादी गोष्टीत आनंद मिळवूया. हीच आपल्यातून गेलेल्या आपल्या बांधवांना खरी आदरांजली ठरेल, यात दुमत नाही. अशा गप्पानी रंगलेल्या विचारानंतर सर्वांनी एकत्र पंगतीने भोजन केले. नात्यांची ही वीण अधिक घट्ट करायला शंभर पेक्षा अधिक नातेवाईक कोणताही समारंभ अथवा कार्यक्रम नसतात मुद्दामहून वेळ काढून आणि सर्व अडचणींवर मात करीत एकत्र आले होते .
हा आनंददायी सोहळा यशस्वी होण्यासाठी शरद देवळेकर, सौरभ लाड, सचिन पाटणे, संतोष खातू, मधुकर लाड इत्यादी मंडळींनी परिश्रम घेतले.