महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षण
कोंडीयेतील ‘शेतकरी कन्या’ झाली वकील!

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कोंडीये गावचे श्री.धोंडू शिवराम दसम यांची सुकन्या कु. कल्पना धोंडू दसम हिने ३ वर्षाचा वकिलीचा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करून ती नुकतीच विधी परिक्षा उत्तीर्ण झाली आहे.
कल्पना हिच्या वडीलांचा व्यवसाय शेती असून सुद्धा आईवडीलांची चिकाटी आणि मुलीची जिद्द तसेच घरातील परिस्थिती बेताची जरी असतानाही त्याही परिस्थितीतून कु.कल्पना हिने शिक्षण पूर्ण करून व ३ वर्षे अभ्यासात मेहनत घेऊन विधी परिक्षा देऊन उत्तीर्ण झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील कोंडीये गावातून दसम परिवारातून व कुणबी समाजातील पहिली वकील ठरली आहे.