महाराष्ट्र
मुरुडमधील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब, सदानंद कदम दापोली कोर्टासमोर हजर
सुनावणीची पुढील तारीख २३ फेब्रुवारी
दापोली : या आधीच्या महाविकास आघाडीवर सरकारमधील तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब तसेच सदानंद कदम आज ( गुरुवारी) दापोली कोर्टात प्रत्यक्ष हजर झाले. न्यायालयाने त्यांना प्रत्येकी रु 15,000/- चा जामीन मंजूर केला. या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुरुडच्या समुद्रकिनाऱ्यावर सीआरझेडच्या नियमाचे उल्लंघन करून रिसॉर्टचे अवैध बांधकाम करण्याचा आरोप केला होता.
दापोली तालुक्यातील मुरुड येथील समुद्र किनाऱ्यावर CRZ, ना – विकास क्षेत्र (NDZ) परिसरात साई रिसॉर्ट बांधल्याच्या संबंधात भारत सरकारची याचिके नुसार अनिल परब तसेच सदानंद कदम यांना यांनादापोली येथील हजार न्यायालयापुढे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. न्यायालयाने या संदर्भातील सुनावणीसाठी दि. 23 फेब्रुवारी २०२३ ही तारीख दिली आहे.