नांदेड-पुणे-पनवेल एक्सप्रेसचा सावंतवाडी रोडपर्यंत विस्तार करण्याची मागणी

- अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीकडून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा
रत्नागिरी : नांदेड-पुणे-पनवेल एक्सप्रेस ही गाडी आता सावंतवाडी रोडपर्यंत विस्तारण्याची मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने रेल्वेकडे केली आहे. या मागणीला स्थानिक प्रवाशांनी आणि व्यापाऱ्यांनी बळ दिले आहे. या विस्तारामुळे कोंकण प्रदेशातील प्रवाशांना अधिक सुविधा मिळेल आणि प्रवास सोपा होणार आहे.
सध्या ही गाडी (17613/17614) पनवेलपर्यंत धावते, परंतु कोंकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या सावंतवाडी रोडपर्यंत विस्तार केल्यास या भागातील लोकांना मोठा फायदा होईल. या विस्तारामुळे कोकण आणि महाराष्ट्राच्या विविध भागांतील प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवास करता येईल.
कोकण रेल्वे मार्गावर प्रस्तावित अतिरिक्त थांबे
पेण, नागोठणे, रोहा, माणगाव, वीर, सापे वामणे, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.
या मागणीला समर्थन देण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि जनप्रतिनिधींनीही पुढाकार घेण्याची गरज कोकण विकास समितीने केली आहे.
नांदेड-पनवेल एक्सप्रेसच्या विस्तारामुळे केवळ प्रवाशांनाच नाही तर व्यापाऱ्यांनाही फायदा होईल. कोंकण प्रदेशातील उत्पादनांची वाहतूक आता अधिक सुलभ होणार आहे.
- हे देखील अवश्य वाचा : Konkan Railway | दादर- सावंतवाडी राज्यराणीला तुतारी एक्सप्रेस का म्हणतात?
- छोटा भीमचा रेल्वे प्रवाशांना मोठा संदेश!
- पनवेलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सप्टेंबरपासून उड्डाण!