काजू बागेतील सेंद्रीय क्रांती!

- विद्यार्थ्यांच्या हस्ते झाली सेंद्रीय खतांचा वापर करून हरित समृद्धतेची सरुवात
चिपळूण : “निसर्गाशी नातं जोपासा, सेंद्रिय शेतीचा मार्ग स्वीकारा!” या प्रेरणादायी मंत्राला अनुसरून कात्रोळी कुंभारवाडी येथे गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी-पालवण (संचलित – डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था) आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कृषीदुतांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय खत प्रात्यक्षिक कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतकरी रोहित साळवी यांच्या काजू बागेत जाऊन नैसर्गिक स्रोतांपासून तयार झालेल्या सेंद्रिय खतांचा (वर्मी कम्पोस्ट, गांडूळ खत, नीमखोळ व पंचगव्य) वापर केला. खत टाकण्यापूर्वी मातीची अवस्था तपासून, योग्य अंतरावर खड्डे खोदून खतांचे काटेकोर प्रमाणात वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने ही कृती पार पाडल्याने त्यांच्या मनात सेंद्रिय शेतीबद्दल आत्मियता निर्माण झाली.
संपूर्ण परिसर ‘मातीमय आणि मातीश्री’ वातावरणाने भारलेला होता. विद्यार्थ्यांचे कुतूहल, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कृषीदुतांचे अनुभव यांचा सुरेख संगम दिसून आला.
“सेंद्रिय खत हे केवळ पर्याय नसून, आजच्या काळातील गरज आहे. मातीचा पोत टिकवायचा असेल, तर नैसर्गिक घटकांचाच वापर करून पीक उत्पादनात सातत्य ठेवणे आवश्यक आहे.”
सदर कार्यक्रमासाठी चे मार्गदर्शन हे कृषिभूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे , गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम , जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शमिका चोरगे , ग्रामीण कृषी कार्यानुभव समन्वयक प्राध्यापक प्रशांत इंगवले तसेच विषय शिक्षक प्राध्यापक महेंद्र गावनांग यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रम यशस्वी पणे पार पाडण्यासाठी कृषिसखा ग्रुपचे सर्व कृषिदूत आनंद नलावडे,स्वयं बारी,अनिरुद्ध घंटे,सत्यजित आसने,घनश्याम राऊत,ईशान डुंबरे,साहिल रसाळ,प्रतिक नाईक, श्रेयस सावंत,अंकुश पवार,श्रीगोपाल नायर आणि
रुदुल आखाडे हे सर्वजण उपस्थित होते.स्थानिक ग्रामस्थ यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांनी सेंद्रिय खत वापर करतानाचे क्षण टिपले गेले – जे त्यांच्यासाठी शिक्षणासोबतच एक संस्मरणीय अनुभव ठरला.