रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यात चार वाघ तर सहा ब्लॅक पँथरचा वावर!

रत्नागिरी : जिल्ह्याला लाभलेल्या वनक्षेत्रात ४ नर जातीच्या वाघांचे अस्तित्व सीसीटीव्ही ट्रॅप कॅमेऱ्यात बंदिस्त झाले आहे आहेत. याचबरोबर ६ ब्लॅक पँथर, मोठ्या प्रमाणात वानर, माकडे असल्याची माहिती विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांनी दिली आहे.
वनविभाग चिपळूण-रत्नागिरी, सामाजिक वनीकरण विभाग रत्नागिरी व ग्लोबल चिपळूण टुरिझम यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित जिल्हयातील शेतकऱ्यांना खैर प्रजातीच्या रोपांचे मोफत वाटप, वन वणवा प्रतिबंधात्मक उपाययोजना कार्यशाळेत प्रास्ताविक करताना त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, एकूण वन क्षेत्रापैकी ९९ टक्के क्षेत्र हे खासगी मालकीचे असून केवळ १ टक्का वनक्षेत्र वनविभागाकडे आहे. मात्र असे असले तरी सर्वच वनक्षेत्रात विविध प्राण्यांचे वास्तव्य आहे. खासगी क्षेत्रात ६ ब्लॅक पॅथर, वानर, माकडांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे केले नमूद वनविभागाला काहीही करता येत नसून करायचे झाल्यास अनेक अडचणी येतात.

जिल्ह्यातील वनक्षेत्रामध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चार वाघांचे अस्तित्व दिसून आले आहे. ही बाब महत्त्वाची आहे. याचबरोबर ६ ब्लॅक पँथर तसेच मोठ्या प्रमाणात वानर, माकड दिसून येतात.
दरम्यान, जिल्ह्याला लागलेल्या वनक्षेत्रात पर्यावरण दृष्टीने सुखद मानले जात आहेत. आतापर्यंत अधून मधून कुठे ना कुठे वाघ दिसल्याच्या बातम्या पसरल्यावर त्याबाबत दुजोरा मात्र मिळत नव्हता. मात्र आता वन खात्याने यावर शिक्कामोर्तब केले आहे.