चिमुकल्या जेनिशावरील उपचारासाठी आहे तुमच्या सढळ हस्ते मदतीची गरज!

- दुर्धर ‘SMA’ आजाराने ग्रस्त जेनिशा पाटीलला मदतीची हाक: ५ कोटींच्या उपचारासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे!
उरण, दि. १४ : उरण तालुक्यातील बोकडविरा येथील अवघ्या २ वर्ष ४ महिन्यांची जेनिशा प्रथमेश पाटील SMA (Spinal Muscular Atrophy Type-3) या दुर्धर आजाराने त्रस्त आहे. जेनिशावर सध्या वाडिया चिल्ड्रेन हॉस्पिटल, परळ आणि नायर हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल येथे उपचार सुरू आहेत. तिच्या या गंभीर आजाराच्या निदानासाठी सुमारे ५ कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
जेनिशाच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने तिच्या उपचाराचा मोठा खर्च तिच्या आई-वडिलांना पेलवणे शक्य नाही. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी विविध सामाजिक संस्था, संघटना, कार्यकर्ते आणि दानशूर व्यक्तींना जेनिशाच्या मदतीसाठी पुढे येण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.
काय आहे SMA Type-3 आजार?
SMA Type-3 हा एक अत्यंत दुर्मिळ आणि गंभीर आजार आहे. डॉ. शिल्पा कुलकर्णी (न्यूरोलॉजिस्ट, वाडिया हॉस्पिटल, परळ) आणि डॉ. अल्पना कोंडेकर (नायर हॉस्पिटल, मुंबई) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आजारावर वेळेवर उपचार न केल्यास तो मुलीच्या शरीरातील सर्व अवयवांना हळूहळू निकामी करू शकतो. यामुळे बाधित व्यक्तीची हालचाल आणि अन्नग्रहण करण्याची क्षमता कालांतराने पूर्णपणे थांबते. जेनिशाचा जीव वाचवण्यासाठी आणि तिला निरोगी आयुष्य देण्यासाठी तातडीने उपचार होणे आवश्यक आहे.
जेनिशाला मदत कशी कराल?

आपल्या छोट्याशा मदतीने जेनिशाचा जीव वाचू शकतो आणि आपल्या हातून एक चांगले पुण्यकर्म घडू शकते. ज्यांना जेनिशाला आर्थिक मदत करायची आहे, त्यांनी खालील बँक खात्यावर आपली मदत पाठवावी:
बँक: स्टेट बँक ऑफ इंडिया
खाते क्रमांक: 30509262966
IFSC कोड: SBIN0009832
कृपया जेनिशाच्या उपचारासाठी सढळ हस्ते मदत करा आणि तिच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.