ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

तुळसुली कर्याद नारूर ठरले सिंधुदुर्गातील ‘सुंदर गाव’…!


तब्बल ४० लाखांचे पटकावले बक्षिस..!

सिंधुदुर्ग :  कुडाळ तालुक्यातल्या तुळसुली कर्याद नारूर हे गाव सन २०२३-२४ या वर्षातलं जिल्ह्यातलं ‘सुंदर गाव ‘ म्हणून घोषित करण्यात आलं आहे. गावच्या ग्रामपंचायतीला, गावाला बक्षिस मिळाल्याचे जाहीर होताच ग्रामस्थानी आनंद व्यक्त केला.


आर. आर. (आबा ) पाटील स्मार्ट ग्राम (सुंदर गाव ) पुरस्कार योजनेंतर्गत या गावाला,गावच्या ग्रामपंचायतीला राज्य शासनाकडून ४० लाखांचे बक्षीस जाहीर झाले आहे. ही घोषणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर यांनी दिली. जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातूनही ‘सुंदर गाव’ निवडलं जातं.कुडाळ तालुक्यातल्या निरूखे गावाला पुरस्कार मिळाला आहे.तालुका स्तरावर निवड झालेल्या गावाना, गावच्या ग्रामपंचायतीना १० लाख रुपयांचा पुरस्कार दिला जातो.
राज्य सरकारच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागातर्फे दरवर्षी ही’ स्मार्ट (सुंदर) गाव ‘स्पर्धा घेतली जाते.bगावाची स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपारिक ऊर्जा, पर्यावरण, पारदर्शकता, तंत्रज्ञान,आदी बाबींवर मूल्यमापन करून ही निवड केली जाते.

तालुका समित्या तालुक्यातलं ‘सुंदर गाव ‘ निवडतात. तरं जिल्हा स्तरावरील समिती जिल्ह्यातलं ‘सुंदर गाव ‘ निवडते.
जिल्ह्यातले अन्य तालुके आणि त्यातील ‘स्मार्ट (सुंदर)गाव’ पुढीलप्रमाणे: मालवण -वराड, देवगड -बापर्डे, वेंगुर्ले -पालकरवाडी व परबवाडी (दोन गावांना विभागून), दोडामार्ग -मणेरी, कणकवली-तरंदळे, वैभववाडी-उपळे, सावंतवाडी-वेत्ये व आरोंदा(दोन गावांना विभागून).

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button