महाराष्ट्र
मकर संक्रांतीनिमित्त गणपतीपुळ्याच्या बापाला हलव्याचे दागिने!
रत्नागिरी : मकर संक्रांतीच्या निमित्ताने रविवारी येथील मंदिरातील श्रींच्या मूर्तीला हलव्याचे दागिने अर्पण करण्यात आले. यावेळी मंदिरात देवस्थानच्या पुजाऱ्यांकडून करण्यात आलेली हलव्याच्या दागिन्यांची आरास भाविकांना भावली.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गणपतीपुळे येथील बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक येत असतात. नुकत्याच झालेल्या अंगारकी यात्रेसाठी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. मकर संक्राती दिनी देखील भाविकांनी श्रींचे मनोभावे दर्शन घेतले.