विद्यार्थ्यांच्या कलाकृती पाहून नवी ऊर्जा मिळाली : मल्हार नाना पाटेकर
सहाशे कलाकृतींचे प्रदर्शन ; सह्याद्री कला महाविद्यालयात कलाजत्रा
संगमेश्वर : माझी आई शिल्प तयार करायची आणि वडील नाना तर उत्तम कमर्शियल आर्टिस्ट आहेत. त्या तुलनेत आपल्याला कलेचा फारसा गंध नाही. मात्र आज सावर्डे कला महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलाकृती पाहिल्या आणि येथून मी कलेची एक नवी उर्जा घेऊन जाणार आहे. यापुढे दररोज आपण कलेसाठी एक तासाचा वेळ देणार असल्याचे प्रतिपादन नाम फाऊंडेशनचे मल्हार नाना पाटेकर यांनी केले .
सावर्डे ता. चिपळूण येथील सह्याद्री कला महाविद्यालयात चित्र शिल्प कलाप्रदर्शनाचे उदघाटन रविवार दि. १५जानेवारी २०२३रोजी मल्हार पाटेकर यांच्या हस्ते संपन्न झाले
. यावेळी व्यासपीठावर चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व सह्याद्री शिक्षण संस्था कार्याध्यक्ष माननीय शेखर गोविंदराव निकम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. मधुकर वंजारी, प्रा. राजेंद्र महाजन, ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के, महेश महाडिक हे उपस्थित होते . या उदघाट्न प्रसंगी बोलताना मल्हार पाटेकर पुढे म्हणाले की, सर्व कलाकृती पाहून मी मंत्रमुग्ध झालो. आणि विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपून केलेल्या कलाकृती जास्त भावल्याचे नमूद केले
.
आमदार शेखर निकम बोलताना म्हणाले की,शालेय शिक्षणात चित्रकला, कार्यानुभव हे सक्तीचे विषय असायला पाहिजेत या विषयांमुळे विद्यार्थी हा त्याच्या आवडीच्या क्षेत्रात नावलौकिक मिळवू शकतो असे नमूद केले. तसेच या कला प्रदर्शनाचे औचित्य साधून प्रतिवर्षी शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदजी निकम कला जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. कला क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्या तसेच सामाजिक बांधिलकी जपणार्या कलाकाराला या पुरस्काराने गौरवण्यात येते यावर्षी हा गौरव मालवण तालुक्यातील देवबाग या ठिकाणी स्थित टोपीवाला हायस्कुल येथे कला शिक्षक म्हणून कार्यरत असणारे चित्रकार कलाशिक्षक बलराम गोविंद सामंत यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच या कला प्रदर्शनाचे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे प्रदर्शनातील कला विद्यार्थ्यांच्या कलाकृती पाहण्याचा व विकत घेण्याचा आनंद या कला जत्रेत कलारसिकांना घेता येणार आहे.
या प्रदर्शनात शंभरहून अधिक कलाकारांच्या ६०० कलाकृती मांडल्या आहेत. या कलाप्रदर्शनाचे औचित्य साधून प्रतिवर्षी कलामहाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन व कौतुकाची थाप म्हणून विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. यावर्षी पुरस्कारासाठी निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे...
मूलभत अभ्यासक्रम -प्रथम पारितोषिक – भूषण थवी , द्वितीय पारितोषिक-कु. सेजल महाडिक , उत्तेजनार्थ पारितोषिक- सार्थक आदवडे , उत्तेजनार्थ पारितोषिक-सोहम धामणस्कर , कलाशिक्षक पदविका – प्रथम पारितोषिक- राकेश भेकरे , द्वितीय पारितोषिक- सविता मुलेवा , उत्तेजनार्थ पारितोषिक. सुमित गेल्ये , उत्तेजनार्थ पारितोषिक- तेजस धोपट , रेखा व रंगकाला विभाग – प्रथम पारितोषिक-सुजल निवाते , द्वितीय पारितोषिक-सिद्धेश जाधव , उत्तेजनार्थ पारितोषिक-ऋतिका शिरकर , उत्तेजनार्थ पारितोषिक-ईशा राजेशिर्के
शिल्प व प्रतिमानबंध कला- सर्वोत्कृष्ट रचना शिल्प कलाकृती -शुभम पांचाळ , पाषाण / काष्ठ माध्यमातील सर्वोत्कृष्ट शिल्प कलाकृती.हिमांशू कुडाळकर , उत्तेजनार्थ पारितोषिक. विशाल मसणे , उत्तेजनार्थ पारितोषिक.राज कुंभार ,
उत्कृष्ट निसर्गचित्रण कलाकृती. करण आडवडे , उत्कृष्ट सृजनात्मक कलाकृती. सोहम घोडे , उत्कृष्ट रेखांकन पारितोषिक. सायली कदम , उत्कृष्ट व्यक्तीचित्रण कलाकृती. विभती जाधव , उत्कृष्ट त्रिमित संकल्प (मूलभूत अभ्यासक्रम) वेदिका सालम , उत्कृष्ट व्यक्तिचित्रं कलाकृती. संकेत कदम , उत्कृष्ट रचना चित्रकलाकृती. प्रसाद धनावडे , उत्कृष्ट सृजनात्मक, व्यक्तीचित्रण चित्राकृती. पुष्कराज देवरुखकर, विशाल मसणे, प्रतीक लोंढे , सर्वोत्कृष्ट सूचनात्मक कलाकृती- साक्षी मोरे ,मूलभूत अभ्यासक्रम परीक्षेत कला महाविद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल पारितोषिक. प्रथमेश गोंधळी, कला शिक्षक पदविका परीक्षेत कला महाविद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल. वैष्णवी शेडगे
रेखा व रंगकला डिप्लोमा विभाग परीक्षेत कला महाविद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल. प्रणय फराटे , शिल्प व प्रतिमान बंद कला परीक्षेत कला महाविद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल. विश्वनाथ धामणस्कर , शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदा जी निकम आदर्श विद्यार्थी पारितोषिक. संकेत कदम , प्रकाश अर्जुन राजेशिर्के पुरस्कृत स्वर्गीय सौ प्रभावती बाई बरांजि राजेशिर्के कला महाविद्यालयातून आदर्श विद्यार्थिनी. विभती जाधव , कला शिक्षक पदविका अभ्यासक्रमातील आदर्श विद्यार्थिनी स्वर्गीय श्रीमती सिद्धी सुधीर मोरे स्मरणार्थ. पूर्वा शिगवण या प्रदर्शनाचे अजून एक खास आकर्षण म्हणजे या कला प्रदर्शनाचा व विक्रीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन कला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री माणिक शिवाजी यादव यांनी केली आहे. तसेच या कला प्रदर्शनाचे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे प्रदर्शनातील कला विद्यार्थ्यांच्या कलाकृती पाहण्याचा व विकत घेण्याचा आनंद या कला जत्रेत कलारसिकांना घेता येणार आहे. या कलाप्रदर्शनाचे औचित्य साधून प्रतिवर्षी कलामहाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन व कौतुकाची थाप म्हणून विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. हे सर्व कला रसिकांसाठी एक प्रकारची पर्वणीच असणार आहे. जास्तीत जास्त संख्येने या कला प्रदर्शनाचा व विक्रीचा आस्वाद घ्यावा
, असे आवाहन कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक शिवाजी यादव यांनी केली आहे.