रत्नागिरीच्या आरे वारे समुद्रकिनारी चौघे बुडाले

बुडालेल्या दोन तरुणी ठाण्यातील मुंब्रा येथील तर अन्य दोघे स्थानिक
रत्नागिरी, १९ जुलै २०२५ : रत्नागिरी शहरानजीकच्या आरे-वारे समुद्रकिनारी एक दुर्दैवी घटना घडली आहे. शनिवारी सायंकाळी समुद्रात उतरलेल्या चार जणांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. यामध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या घटनेने रत्नागिरीत खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शहरातील ओसवाल नगर भागातून काही लोक शनिवारी सायंकाळच्या सुमारास आरेवारे येथील समुद्रकिनारी फिरायला गेले होते. यावेळी समुद्रात उतरलेल्या चौघांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते बुडाले.

बुडालेल्यांची नावे
उझमा शेख (१८), उमेरा शेख (२९, दोघेही राहणार मुंब्रा ठाणे), झैनब काझी (२६) आणि जुनैद काझी (३० दोघेही राहणार ओसवाल नगर रत्नागिरी )
घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य सुरू असताना, बुडालेल्या सर्वच्या सर्व म्हणजे चार जणांचे मृतदेह मृतदेह हाती लागले आहेत. बुडालेल्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी स्थानिकांची मदत झाली.
या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आरेवारे येथील समुद्रात चौघे बुडाल्याची ही घटना पर्यटकांनी समुद्रात उतरताना अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित करते.
मुख्य मुद्दे
- स्थळ: रत्नागिरी नजीकचा आरेवारे समुद्रकिनारा
- घटनेची वेळ: शनिवार सायंकाळ ६ वाजून तीस मिनिटांच्या सुमारास
- बळींची संख्या: ४ (३ महिला, १ पुरुष)
- प्राप्त मृतदेह: ४
- सद्यस्थिती: सर्वच्या सर्व चारही मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे पुढील सोपस्करांसाठी आणले.