ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज
Konkan Railway | गणपती स्पेशल विशेष गाड्यांचे आरक्षण २३ जुलैपासून

रत्नागिरी: गणेशोत्सव २०२५ साठी कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांचे बुकिंग २३ जुलै २०२५ पासून सुरु होणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने काही विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. त्यामुळे आता प्रवास करणे अधिक सोयीचे होणार आहे.
या गाड्यांचे बुकिंग 23 जुलै 2025 पासून सुरु:
- ०९०१२
- ०९०२०
- ०९०१६
- ०९११३
- ०९११०
- ०९११९
त्वरित बुकिंग करा आणि आपले कोकणातील प्रवास निश्चित करा!
गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे जागा लवकर भरण्याची शक्यता आहे. आपल्या सोयीनुसार आणि वेळेनुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करून आजच तिकीट बुकिंग करा.
कसे कराल बुकिंग? - IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर (www.irctc.co.in)
- रेल्वे स्थानकांवरील पीआरएस (Passenger Reservation System) काउंटरवर
या विशेष गाड्यांमुळे कोकणात जाणे अधिक सुखकर होणार आहे.