महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल
कोकणातून धावणाऱ्या दुरंतो एक्सप्रेसला स्लीपरचे तीन डबे कायमस्वरूपी वाढवले

मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढत्या मागणीला प्रतिसाद देत रेल्वेने कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या 12284 / 12283 ह. निजामुद्दीन जं. – एर्नाकुलम जं. – ह. निजामुद्दीन जं. “दुरंतो” एक्स्प्रेस (साप्ताहिक) या गाडीमध्ये कायमस्वरूपी कायमस्वरूपी अतिरिक्त तीन स्लीपर डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना आता अधिक जागा उपलब्ध होणार असून, प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर होईल.
बदललेली कोच रचना खालीलप्रमाणे
ट्रेन क्रमांक 12284 / 12283 ह. निजामुद्दीन जं. – एर्नाकुलम जं. – ह. निजामुद्दीन जं. “दुरंतो” एक्स्प्रेस (साप्ताहिक)
जुनी कोच रचना (19 LHB डबे):
- फर्स्ट एसी (First AC): 01
- 2 टायर एसी (2 Tier AC): 02
- 3 टायर एसी (3 Tier AC): 10
- स्लीपर (Sleeper): 03
- पॅन्ट्री कार (Pantry Car): 01
- जनरेटर कार (Generator car): 01
- एसएलआर (SLR): 01
नवीन कोच रचना (22 LHB डबे): - फर्स्ट एसी (First AC): 01
- 2 टायर एसी (2 Tier AC): 02
- 3 टायर एसी (3 Tier AC): 10
- स्लीपर (Sleeper): 06 (3 अतिरिक्त स्लीपर डबे)
- पॅन्ट्री कार (Pantry Car): 01
- जनरेटर कार (Generator car): 01
- एसएलआर (SLR): 01
प्रवासाची सुरुवात (नवीन रचनेसह): - ट्रेन क्रमांक 12284 ह. निजामुद्दीन जं. येथून: 02/08/2025 पासून
- ट्रेन क्रमांक 12283 एर्नाकुलम जं. येथून: 05/08/2025 पासून
या बदलामुळे दुरंतो एक्स्प्रेसमध्ये एकूण डब्यांची संख्या 19 वरून 22 LHB डब्यांपर्यंत वाढणार आहे, ज्यात प्रामुख्याने स्लीपर क्लासमध्ये वाढ करण्यात आली आहे.
या आणि इतर गाड्यांच्या थांब्यांबद्दल आणि वेळापत्रकांबद्दल सविस्तर माहितीसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.