खेडमध्ये दुर्मिळ सागरी माशाची किमती उलटी जप्त
उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी किंमत
रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरणे नाका येथे खेड पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाईत व्हेलसारख्या दुर्मिळ सागरी माशाची उलटी जप्त केली. आंतरराष्ट्रीय बाजारात एका किलोला कोट्यवधी रुपयांची किंमत मिळणाऱ्या या उलटीची संशयीतांकडून तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलिसांच्या एका पथकाने सापळा रचून रविवारी ही कारवाई केली. यामध्ये तिघेजण लुप्त प्रजातीमधील सागरी माशाची उलटी घेऊन तिची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार संशय तिघांची तपासणी केली असता. त्यांच्याकडे लुप्त प्रजातीच्या माशाच्या उलटी सदृश पदार्थ आढळून आला. या संदर्भातील अधिक चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. या कारवाई मध्ये पोलिसांनी तिघा संशयीतांसह तस्करी करण्यासाठी आणलेली उलटी देखील जप्त केली आहे