मुंबई-गोवा महामार्गाची आज बांधकाम मंत्र्यांकडून पाहणी

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गची पाहणी करण्याच्या दृष्टीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले ७ ऑगस्ट रोजी जिल्हा दौरा करीत आहेत. मात्र त्यांचा जाहीर झालेला दौरा लक्षात घेतला तर गतवर्षीप्रमाणे यावेळीही महामार्ग पाहणी रात्रीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.

गुरुवारी सकाळी १०.३० वाजता रायगड जिल्ह्यातील पळस्पे येथून त्यांच्या महामार्ग पाहणीला प्रारंभहोणार आहे. त्यानंतर दुपारी १.३० वाजता महाड येथील शासकीय विश्रामगृहात महामार्ग आढावा बैठक होऊन सायंकाळी ४ वाजता ते कशेडी बोगद्यासह पॅकेज ३ची पाहणी करणार आहेत. सायंकाळी ४.३० वाजता कशेडी ते परशुराम या पॅकेज ४ ची, तर सायंकाळी ५ वाजता परशुराम चिपळूण-आरवलीं, पॅकेज ५ ची पाहणी करणार आहेत. सायंकाळी
गतवर्षीप्रमाणे यंदाही महामार्ग पाहणी रात्री होण्याची चिन्हे
५.४५ वाजता आरवली ते कांटे पॅकेज-६ची तर सायंकाळी ६.३० कांटे ते हातखंबा पॅकेज ७ व हातखंबा ते रत्नागिरीची शासकीय विश्रामगृहाकडे ते प्रयाण करणार आहेत.