जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत स्वर घाग याला कांस्य पदक

- आमदार शेखर निकम यांच्याकडून गौरव
चिपळूण: चिपळूण पुष्कर हॉल येथे झालेल्या तायक्वांदो जिल्हास्तरीय चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत फ्री स्टाईल पुमसे स्वर संदीप घाग याने कांस्य पदक तर चिपळूणच्या एल. एम. बांदल हायस्कुल येथे चिपळूण तालुका इंटरस्कुल तायक्वांदो स्कुल चॅम्पियनशिप 2025 साठी झालेल्या स्पर्धेत तायक्वांदो फाईट स्पर्धेत नायशी गावचा सुपुत्र व सह्याद्री शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मीडीयम स्कूललमधून भाग घेत स्वर संदीप घाग याने तिसरा क्रमांक पटकवत तायक्वांदो स्पर्धेतील पहिलं ब्रॉंझ पदक मिळवले. या यशाबद्दल चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी शाळेत भेट देऊन स्वरचे अभिनंदन केले.
स्वर हा पत्रकार संदीप घाग यांचा सुपुत्र असून त्याच्या यशाबद्दल नायशी ग्रामस्थ पंचक्रोशीतून अभिनदनाचा वर्षाव होत आहे तायक्वांदो जागतिक कराटे संस्थेच्या शालेय स्पर्धेतून तालुका स्तरावरून चिपळूण पुष्कर हॉल येथे झालेल्या तायक्वांदो जिल्हास्तरीय च्यपियनशिप 2025 स्पर्धेत फ्री स्टाईल पुमसे जिल्हास्तरावर झेप घेत पुन्हा कांस्य पदक प्राप्त केले.
स्वरने सावर्डे येथील अमेय क्लासेस येथे भरत कररा यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्टोबर 2024 पासून कराटे प्रशिक्षण सुरू केले. प्रचंड मेहनत नियमित सराव यांच्या जोरावर जिद्द चिकाटी प्रामाणिक पणाच्या जोरावर जिल्हातरावरील पहिलं कांस्य ( ब्रॉंझ) पदक प्राप्त केले.
स्वरच्या यशात आई वडील तसेच अमेय क्लासेसच्या चेअरमन राम नांदिवडेकर, सौ नांदेडकर, प्रशिक्षक भरत कररा, ऋतुज मते याचे महत्वपूर्ण योगदान आहे