महाराष्ट्र
आनंद तापेकर मराठी पत्रकार परिषद रत्नागिरीच्या अध्यक्षपदी
मुंबई : मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी जिल्ह्याच्या अध्यक्षपदी आनंद तापेकर यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पाबळे यांनी केली आहे.
परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तुकाराम देवरूखकर यांची अध्यक्षपदाची मुदत २०२२ मध्ये संपल्याने त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.. तो स्वीकारण्यात आला असून त्यांच्या जागी आनंद तापेकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे.. पुढील दोन वर्षांसाठी ते अध्यक्ष म्हणून कार्यरत असतील.
तापेकर हे रत्नागिरी एक्स्प्रेसचे आवृत्ती प्रमुख आहेत.. रत्नागिरी तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.. ते उत्तम साहित्यिक देखील आहेत..
एस.एम देशमुख आणि विश्वस्त किरण नाईक यांनी तापेकर यांचं अभिनंदन केलं आहे..