कोकण विभागातील पहिला ‘अमृत’ मेळावा गुरुवारी

रत्नागिरी, दि. 19 : अमृत योजनांच्या प्रचार प्रसारासाठी कोकण विभागातील पहिला अमृत मेळावा गुरुवार 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वा. अंबर हॉल, टी आर पी येथे आयोजित करण्यात आला असल्याचे महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) चे जिल्हा व्यवस्थापक महेश गर्दे यांनी कळविले आहे. या मेळाव्याला ‘अमृत’ चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी तसेच विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्याच्या माध्यमातून अमृत लक्षित गट (ब्राह्मण, बनिया, राजपुरोहित, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार. ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, गुजराथी, जाट, सिंधी, कानबी, राजपूत,कोमटी, हिंदू मारवाडी) यांच्याकरिता असलेल्या विविध योजना (स्वयंरोजगार, शिक्षण विषयक, कर्ज व्याज परतावा, बेकरी, सोलर तसेच इम्पोर्ट एक्सपोर्ट आदी प्रशिक्षणे, IGTR, CIPET, NIELIT, C-DAC, MKCL आदी तांत्रिक व तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षणे) यांसह विविध योजनांची माहिती, रजिस्ट्रेशन आणि लाभ घेण्यासाठी लक्षित गटातील लोकांनी ‘अमृत मेळाव्याला’ उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.