चिपळूणनजीक खडपोली पूल कोसळला

- अलोरे पोलीस ठाणे हद्दीतील पेंडाबे ते खडपोली पर्यायी मार्गाने वाहतूक
रत्नागिरी : पिंपळी नंदिवसे ता. चिपळूण येथील प्रजिमा 23 साखळी क्रमांक 1/00 खडपोली पूल शनिवारी रात्री 10.30 वाजता कोसळला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली असून, अलोरे पोलीस ठाणे हद्दीतील पेंडाबे ते खडपोली जाणाऱ्या पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे.
हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने एम आय डी सी कडे हस्तांतरित केलेला होता.
पालकमंत्री डाॕ. उदय सामंत यांनी ५ जुलै रोजी चिपळूण येथील ‘सहकार भवन’मध्ये खडपोली आणि खेर्डी एमआयडीसी नागरिकांच्या समस्यांबाबत विशेषतः पुलांच्या बांधकामाबाबत बैठक घेतली होती. रस्ता, पूल यासाठी २७ कोटी मंजूर केले होते.
पावसाळ्यामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करुन, पावसाळ्यानंतर काम सुरु झाले पाहिजे. खडपोली आणि खेर्डी एमआयडीसीसंदर्भातील समस्या मार्गी लावा, अशा सूचनाही त्यांनी त्यावेळी दिल्या होत्या.