लांजा तालुक्यातून महिला व दोन मुले वर्षभरापासून बेपत्ता

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील खालची कुंभारवाडी येथील रहिवासी श्रीमती किरण संजय चव्हाण (वय 27) या दि. 28 ऑक्टोबर 2024 रोजी सायं. 5 वाजता आपली मुलगी सृष्टी ( 6) व मुलगा स्वराज ( 4) यांच्यासह घरातून बाहेर पडल्या असून त्यानंतर तिघेही बेपत्ता झाले आहेत.
श्रीमती किरण चव्हाण यांची उंची सुमारे 5 फुट 4 इंच, गोरा रंग, उभट चेहरा, सरळ नाक, मध्यम केस असे वर्णन आहे. त्या बेपत्ता झाली तेव्हा चॉकलेटी टॉप, पांढरा सलवार परिधान केलेल्या होत्या. त्यांच्या गळ्यात छोटे व मोठे सोन्याचे मंगळसूत्र, हार, कानात सोन्याच्या कुडी, नाकात नथनी, हातात हिरव्या काचेच्या बांगड्या, सोन्याच्या अंगठ्या तसेच पायात चांदीची जोडवी व पैंजण होते. त्यांच्या सोबत चॉकलेटी रंगाची सॅक होती ज्यामध्ये कपडे व अंदाजे रु. 44 हजार रोख होते. कपाळावर लाल टिकली होती.
मुलगी सृष्टी हिची उंची 4 फुट, रंग गोरा, केस छोटे असून तिने चॉकलेटी टॉप व आकाशी लेगीन्स
परिधान केले होते. मुलगा स्वराज याची उंची 3 फुट 4 इंच असून त्याने काळा टी-शर्ट व पॅन्ट परिधान केले होते. त्याच्या कानात सोन्याची एक बाली व पायात चप्पल होती.
बेपत्ता महिलेजवळ पांढऱ्या रंगाची अॅक्टीवा (MH-08 AR-0887) आहे. या तिघांविषयी कोणाला माहिती मिळाल्यास संबंधितांनी जवळच्या पोलीस ठाण्यात त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.