कोंड्ये ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार आ. निकम यांचे हस्ते प्रदान

देवरूख (सुरेश सप्रे) : महा आवास अभियान राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनांतर्गत विविध उपक्रमांचा माध्यमातून केलेल्या कामांमुळे तालुक्यातील कोंड्ये ग्रामपंचायतीला ”सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत” द्वितीय क्रमांक पुरस्कार प्राप्त झाला होता.
हा पुरस्कार २०२४-२५च्या आमसभेत चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे l आम. शेखर निकम यांच्या हस्ते माजी सरपंच सौ. पूनम महेश देसाई व ग्रामस्थ यांना प्रदान करण्यात आला.
सदरचा पुरस्कार सोहळ्याला गटविकास अधिकारी आनंद लोकरे तहसीलदार अमृता साबळे. सह्हायक गटविकास अधिकारी विनोद शिंदे. माजी जिप अध्यक्ष रोहन बने. राजू महाडीक. संतोष थेराडे. कसबा जि.प. गटाचे विभाग प्रमुख आणि कोंड्ये गावाचे सरपंच महेश देसाई, माजी सरपंच.सुरेश दसम, ग्रा.पं. कर्मचारी विजय सुवरे, सौ.स्वरा शीतप, शाखा प्रमुख प्रदीप शीतप, ग्रामसेवक लवा पाचवे आदी उपस्थित होते.
या वेळी शासनाकडून चांगले काम करणार्या ग्रामपंचायतींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामधे कोंड्ये ग्राम पंचायतीने मोदी आवास घरकुल योजनेचे केलेले सर्वोत्तम काम व शासनाच्या विविध योजनांतर्गत राबवलेले उपक्रम याची विशेष दखल घेत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणुन दुसरा क्रमांक मिळवण्याचा मान कोंड्ये ग्रामपंचायतीला प्राप्त झाला.
विद्यमान सरपंच महेश देसाई. व माजी सरपंच सौ. पुनम देसाई यांनी आपल्या कारकीर्दीत विविध शासकीय योजनांचा लाभ सर्वांना बरोबर घेत त्या जनसामान्यांपर्यंत पोहचवत आदर्शवत काम करत असल्याने यापुर्वी कोंड्ये ग्रामपंचायतीला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
सरपंच महेश देसाई व माजी सरपंच सौ. पुनम देसाई यांनी अनेक उपक्रम स्वखर्चाने राबविले आहेत. त्यामध्ये
मोदी किसान योजना बंद पडणार्या लाभार्थ्यांना ती पुन्हा चालू करून देणे, आधार लिंक करणे, कामगार कल्याण खात्यामार्फत गावातील बांधकाम मजूर व घरेलू महिला साहित्य वाटप. विविध कॅंप, चष्मा शिबीर यामध्ये डोळे तपासणी, मोफत चष्मा तसेच लाभार्थ्यांना मोतीबिंदू असल्यास त्यांचे ऑपरेशन लायन क्लब मार्फत मोफत करून घेण्यासाठी त्याना गावातून रत्नागिरीत येथे घेऊन जाणे व पुन्हा गावी घेवून येणे यासाठी लागणारा खर्च तसेच त्या दरम्यान त्यांचा इतर खर्च ईत्यादी सर्व खर्च हा सरपंच महेश देसाई आपल्या माध्यमातून करतात. कोविड काळामध्ये लसीकरण करून घेण्यासाठी पुढाकार घेऊन व स्वखर्चाने त्यासंबंधीत प्रमाणपत्र मिळवून दिली होती. तसेच त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. शासनाच्या सर्व योजना ग्रामस्थांना वेळेत मिळवून दिल्या असून लाडकी बहीण योजना सुद्धा बहिणींना मिळवून देण्यासाठी पालकमंत्री ना. सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न करत लाभ मिळवून दीला.तसेच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी महेश देसाई विशेष योगदान दिले आहे.
यापुर्वी कोंड्ये ग्राप ला आदर्श गाव पुरस्कार. संत गाडगे बाबा गाव स्वच्छ अभियानांतर्गत गावाला निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत तसेच राजापूरचे आम. किरण सामंत यांच्यामुळे मार्गदर्शनाखाली गावातील विकास कामे गतीने करता आली. तसेच माजी सरपंच दत्ताराम शीतप, सुरेश दसम. माजी उप सरपंच दिपक शिंदे,नारायन सूवरे त्यांच्या कार्यकाळात त्यांनीही गावासाठी विशेष कामगिरी बरोबरच संपूर्ण गावाचे मोलाचे योगदान असल्यामुळे एवढा मोठा राज्य पुरस्कार मिळात गावाला सन्मान झाल्याचे सरपंच महेश देसाई यांनी सांगितले व क्रृतज्ञता व्यक्त केली .