Konkan Railway | गांधीधाम-नागरकोईल एक्सप्रेसला एक स्लीपर कोच वाढवला

- रेल्वेच्या कोच संरचनेत तात्पुरता बदल; प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना
रत्नागिरी : गांधीधाम-नागरकोईल साप्ताहिक एक्सप्रेसच्या (Gandhidham-Nagercoil Weekly Express) प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे! रेल्वे प्रशासनाने काही गाड्यांच्या कोच रचनेत तात्पुरता बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलानुसार आता ही गाडी स्लीपर श्रेणीच्या सात ऐवजी आठ डब्यांची धावणार आहे. दिनांक 16 डिसेंबर 2025 च्या फेरीपासून हा बदल लागू होईल. हा बदल लवकरच लागू होणार असून, संबंधित प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 22 एल एच बी डब्यांची ही गाडी कोकण रेल्वे मार्गे
- ‘या’ रेल्वे गाड्यांच्या कोच संरचनेत झाला बदल
गाडी क्रमांक: १६३३६ / १६३३५ नागरकोईल-गांधीधाम-नागरकोईल साप्ताहिक एक्सप्रेस (Nagercoil-Gandhidham-Nagercoil Weekly Express)
हा बदल तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आला असून, यामुळे एकूण कोचची संख्या 22 ही कायम ठेवण्यात आली आहे, परंतु श्रेणीनुसार कोचच्या संख्येत बदल झाला आहे. कोच रचनेत करण्यात आलेल्या बदलानुसार तटू टायरचा एक डबा कमी करून त्या ऐवजी स्लीपर्स राणीचा एक डबा वाढवण्यात आला आहे
️ कधीपासून लागू होणार बदल?
हा सुधारित कोच रचनेचा नियम खालील तारखांपासून लागू होईल:
- गाडी क्र. १६३३६ एक्स्-नागरकोईल (Ex-Nagercoil) १६/१२/२०२५ पासून.
- गाडी क्र. १६३३५ एक्स्-गांधीधाम (Ex-Gandhidham) १९/१२/२०२५ पासून.
या बदलाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या तिकीटावरील कोच क्रमांक आणि स्थितीची खात्री करून घ्यावी, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे





