महाराष्ट्रलोकल न्यूजशिक्षणस्पोर्ट्स
मेहराज मुजफ्फर अली पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी रवाना
मेहराज अली पब्लिक स्कूल काळसुर कौंढर शृंगारतळी शाळेचा विद्यार्थी

रत्नागिरी : शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे झालेल्या 37 व्या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये अली पब्लिक स्कूल काळसुर कौंढर शृंगारतळीचा विद्यार्थी मेहराज मुजफ्फर आली याने सुवर्णपदक जिंकले होते व त्याची निवड राष्ट्रीय कीकबॉक्सिंग स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघामध्ये झाली होती. दिनांक २० ते २३ नोव्हेंबर 2025 रोजी पुणे येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये स्पर्धेसाठी तो रवाना झाला आहे.
मेहराजला या यशामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू डॉ. योगिता खाडे (आयरे) व आंतरराष्ट्रीय खेळाडू हुजैफा ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले. मौलाना शौकत अली नजीर एज्युकेशन ट्रस्टचे सर्व पदाधिकारी , अली पब्लिक स्कूल काळसुर कौंढर शृंगारतळीच्या मुख्याध्यापिका व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले व राष्ट्रीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.





