प्रत्येक बूथवर ५१ टक्के मते मिळवण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरा

- भाजपा प्रदेश अध्यक्ष रवीन्द्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबई दि. १ : राज्यात उद्या होणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत प्रत्येक बूथवर 51 टक्के मते मिळवण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी संपूर्ण ताकद पणाला लावावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले आहे.
श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे की, नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान होत आहे. माझी सर्वांना विनंती आहे, तुम्हाला आम्हाला सर्वांना सशक्त भारत जर बनवायचा असेल तर सशक्त भाजपा बनवणं हे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठीच भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथ वर 51 टक्के मते मिळवण्यासाठीची लढाई आपल्याला जिंकायची आहे. त्यामुळे उद्या सकाळपासून प्रत्येकाने घरोघरी जाऊन भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे सर्व उमेदवार आणि नगरसेवकपदासाठीचे सर्व उमेदवार कसे जिंकून येतील यासाठी पूर्ण ताकदीने, पूर्ण क्षमतेने आपल्याला मैदानात उतरायचं आहे.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला विकसित भारत बनवायचा आहे आणि आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्र तुम्हाला आम्हाला सर्वांना बनवायचा आहे आणि यासाठीच आपल्याला पार्लमेंट टू पंचायत हे सूत्र लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी भाजपाला मतदान करणं हे अत्यंत गरजेचे आहे हे डोक्यात ठेवून भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण ताकदीने आणि क्षमतेने निवडणुकीच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा, एवढीच विनंती मी या निमित्ताने करत आहे, असेही श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.





