भारतीय संस्कृतीचे भव्य दर्शन घडवणारा सांस्कृतिक महोत्सव!
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा उपकम

नाणीज : जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट नाणीज या प्रशालेमध्ये शनिवारी आनंदोत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हमारी संस्कृती हमारा सन्मान’ या थीमवर आधारित प्रशालेतील विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे नृत्ये नाटय असे विविध कार्यक्रम सुंदररित्या सादर केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना शुभाशिर्वाद देण्यासाठी जगदगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी , सकलसौभाग्य संपन्न सुप्रियाताई व दक्षिण पीठाचे उत्तराधिकारी प.पू कानिफनाथ महाराज उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरीचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार उपस्थित होते.

नाणिज क्षेत्री शनिवारी झालेल्या शालेय सांस्कृतिक कार्यक्रमाचे दीप प्रज्वलाने उद्घाटन करताना सौभाग्यवती सुप्रियाताई, शेजारी रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी, शिक्षणाधिकारी किरण लोहार, सरपंच विनायक शिवगण, व अन्य मान्यवर.
श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी नी याप्रसंगी शुभाशिर्वाद देताना या शाळेच्या स्थापनेचा उद्देश्य ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व पूर्णपणे मोफत इंग्रजी ज्ञानाबरोबरच भारतीय संस्कृती व नीतीमूल्य रुजवणारे शिक्षण देण्याचा असून प्रशाला उत्तम माणूस घडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे असे सांगितले.
शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनीही पूर्णपणे मोफत सीबीएसई बोर्ड च्या या प्रशालेतील विविध उपक्रमांचे व जगदगुरुश्रींच्या प्रेरणेने सुरू असलेल्या व्यापक शैक्षणिक कार्याबद्दल कौतुगोद्गार काढले.
या कार्यक्रमासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड प्रशालेचे चेअरमन अर्जुन फुले नाणिज्य सरपंच विनायक शिवगण पोलीस पाटील नितीन कांबळे माजी सरपंच गौरव संसारे ,दत्ताराम शिवगण, तंटामुक्तीचे अध्यक्ष दत्ताराम खावडकर, सचिन उर्फ तात्या सावंत, विश्वस्त शांताराम दरडी, विनोद भागवत, राजन बोडेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
भव्य अशा रंगमंचावर विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता ऋतुराज फडके यांनी केले तर नृत्यदिग्दर्शन संयोगिता आगास्कर यांनी केले
नाणीज दशक्रोशीतून पालकवर्ग व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.





