डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन संपन्न

चिपळूण : कृषिभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रा अध्यक्ष संदीप येलये, प्रमुख पाहुणे कांबळे सर व प्राध्यापक वृंदानी दीपप्रज्वलन व डॉ.बाबासाहेब आंबेडकर च्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
यानंतर विद्यार्थी मनोगतामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले.तसेच प्राध्यापक मनोगतात प्रा.सौ.नंदा कांबळे मॅडम यांनी आपल्या मनोगता मधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्याचा संघर्ष विद्यार्थि वर्गाला सांगितला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.कांबळे सर यांनी आपल्या मनोगतामधून आंबेडकरांचे घटनानिर्मितील योगदान तसेच स्त्रिया,कामगार, शेतकरी यांच्या साठीचे योगदान आपल्या मनोगता मधून व्यक्त केले.
तसेच अध्यक्षीय भाषणामध्ये प्रा येलये सर यांनी बाबासाहेबांचे कार्य आणि विचार पुढे नेणे . हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे सांगितले व आंबेडकरांचे विचार आपल्या मनोगतामधून व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्ष कला ची विद्यार्थिनी कु प्राजक्ता सुतार हिने केले. तर आभार प्रदर्शन कु. समिता पड्याळ हिने केले.




