महाराष्ट्रस्पोर्ट्स

अवघा १२ वर्षीय मयंक म्हात्रे याचा पुन्हा नवा विक्रम!

उरण दि ८ (विठ्ठल ममताबादे ) : उरणचा १२ वर्षीय मयंक म्हात्रे याने भाऊचा धाक्का ते करंजा जेट्टी हे २४ किमी अंतर पोहुन पार करत नवा विक्रम स्थापित केला आहे. मयंक भाऊचा धक्का ते करंजा जेट्टी पोहून पार करणारा पहिला जलतरणपटू ठरला आहे. याआधी त्याने धरमतर ते करंजा आणि घारापुरी ते करंजा हे प्रवाह पोहून पार केले आहेत. तर त्याने पोहून पार केलेले तिनही प्रवाह प्रथम पोहून पार करण्याचा नोंद मयंकच्या नावाने झाली आहे. 

उरण सेंटमेरीज कॉन्व्हेन्ट स्कुलमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या मयंक दिनेश म्हात्रे याने नवा विक्रम स्थापित केला आहे. भाऊचा धक्का ते करंजा जेट्टी हे २४ किमी अंतर त्याने ७ तास २१ मिनिटे ६ सेकंद या वेळेत पार करून आपल्या विक्रमची नवी नोंद केली आहे.

मयंक भाऊचा धक्का ते करंजा जेट्टी पोहून पार करणारा पहिला जलतरणपटू ठरला आहे. महत्वाचे म्हणजे मयंकने याआधी धरमतर ते करंजा जेट्टी हे १८ किमी अंतर पोहून पार केले. हा प्रवाह पोहून पार करणारा तो पहिला जलतरणपटू होता तर घारापुरी ते करंजा जेट्टी हे १८ कमी अंतर पोहून पार करणारा देखील तो पहिला जलतरणपटू ठरला. सलग तीन वर्षे मयंकने तीन समुद्रीय प्रवाह पोहून पार केल्याने तो या तीनही प्रवाह पार करणारा पहिला जलतरणपटू ठरला आहे. 

बदलते हवामान आणि खडतर प्रवास यातून कुठेतरी मयंकाचा आजचा विक्रमी प्रवास मी थांबवण्याच्या पवित्र्यात होतो. मात्र मयंकची जिद्ध आणि इव्हेन्ट पूर्ण कारण्यासाठीची तळमळ पहाता त्याला त्याच्या प्रयत्नासाठी साथ दिली. त्याने केलेला विक्रम भाऊचा धक्का ते करंजा जेट्टी पोहून पार करणारा तो पहिला जलतरणपटू ठरला आहे. तर याआधी केलेले धरतर ते करंजा आणि घारापुरी ते करंजा हे दोनही प्रवाह पोहून पार करणारा तो पहिला जलतरणपटू ठरला आहे. त्याला परदेशातील एक तरी चॅनल पोहताना पहायचं आहे. 

– दिनेश म्हात्रे ( मयंकचे वडील )

सोमवारी पहाटे ३:५५ वाजता भाऊचा धक्का येथून मयंकने समुद्राच्या लाटांवर झेप घेत नव्या विक्रमाला सुरुवात केली. पहाटेचा काळोख, गार हवा, पान्याच्या लाटा त्यातच मोठमोठ्या बोटींचा येणारा अडथळा यातून मार्ग काढत त्याने निर्धारीत वेळेत विक्रम पूर्ण केला आहे. त्याने केलेल्या या विक्रमची नोंद महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेने दखल घेत त्याच्या विक्रमची नोंद केली आहे. तर करंजा जेट्टी येथे विक्रम पूर्ण होताच करंजा ग्रामस्थांनी त्याचे जल्लोषत स्वागतं करत त्याचे अभिनंदन केले. 

   

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button