रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत १२ ते १८ डिसेंबर क्रीडा सप्ताह
१२ ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजन

रत्नागिरी, दि. ११ : क्रीडा संस्कृतीचा जोपासना व्हावी, क्रीडा विषयक वातावरण निर्माण व्हावे. समाजातील प्रत्येक नागरिकाने शारीरिक स्वास्थ्याकरिता व्यायाम करावा अथवा खेळामध्ये भाग घ्यावा, प्रकृती स्वास्थ राखावे. विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीची जाणीव निर्माण व्हावी तसेच खेळाडूंना प्रात्यक्षिक प्रशिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने १२ ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीत
क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यामधील हायस्कूल, महाविद्यालये व स्थानिक मैदाने येथे हे कार्यक्रम राबवले जाणार आहेत.
जिल्ह्यात विविध क्रीडाविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.
या उपक्रमांत कराटे प्रशिक्षण शिबीर, खो-खो प्रशिक्षण वर्ग, जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा, क्रीडा मैदान दौरे, योगासन वर्ग आदींचा समावेश असून विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत मार्गदर्शन, सकस शारीरिक व्यायाम, क्रीडा शिस्त आणि स्पर्धात्मक वृत्ती वाढीस लागण्यासाठी ही उपक्रमांची मालिका उपयुक्त ठरणार आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार कार्यक्रमांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे –
१२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० ते ७ वाजता एकदिवसीय कराटे प्रशिक्षण वर्ग, फाटक हायस्कूल, रत्नागिरी,
१२ ते १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० ते ७ वा. खो-खो प्रशिक्षण वर्ग, छत्रपती शिवाजी स्टेडियम, मारुती मंदिर, १३ ते १४ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन, पाली, ता.जि. रत्नागिरी, १५ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता सावर्डे, डेरवण, ता. चिपळूण येथे क्रीडा मैदान दौड, १२ ते १८ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी स्टेडीयम, मारुती मंदीर येथे सांयकाळी ५ ते ७ वाजता व्हॉलीबॉल प्रशिक्षण वर्ग, १२ ते १८ डिसेंबर रोजी योगा हॉल, शिवाजी स्टेडीयम, मारुती मंदीर येथे सकाळी ७ ते ९ योगासन वर्गचे आयोजन, १२ ते १८ डिसेंबर रोजी जिल्हा क्रिडा संकुल, मारुती मंदीर येथे सायंकाळी ६ ते ८ वाजता तायक्कांदो प्रशिक्षण वर्ग आयोजन करण्यात येणार आहे.




