हातखंबा येथे खडीचा डंपर कारवर उलटला; सातारा येथील ६ जण जखमी
रत्नागिरी जवळ थरार! जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai Goa National Highway) हातखंबा-दर्गा येथील चढणीवर आज (शनिवार, १३ डिसेंबर) दुपारी १२.४० च्या सुमारास एक भीषण अपघात झाला. डांबरमिश्रित खडी भरलेला भरधाव डंपर (Dumper Accident) मागून येणाऱ्या स्विफ्ट कारवर उलटल्याने कारमधील सातारा (Satara) येथील सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
थरकाप उडवणारा अपघात नेमका कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, डंपर (क्र. एमएच-०८-एपी-५६५२) डांबर मिश्रित गरम खडी घेऊन दाभोळेकडून रत्नागिरीकडे येत होता. हातखंबा-दर्गा येथील चढावात आल्यावर डंपर अचानक उलटला. दुर्दैवाने हा डंपर मागून सातारा ते रत्नागिरी दिशेने येणाऱ्या स्विफ्ट कारवर (क्र. एमएच-११-एव्ही-९८२४) जाऊन पडला.
डंपरमधील गरम डांबरमिश्रित खडी थेट कारवर पडल्याने कारचे मोठे नुकसान झाले आणि आतील प्रवासी गंभीर जखमी झाले.
जखमींची नावे
या अपघातात जखमी झालेले सर्व सहा प्रवासी सातारा येथील असून त्यांना तात्काळ उपचारांसाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची नावे खालीलप्रमाणे:
- प्रज्ञा नितीन जाधव (वय २९)
- स्पृहा नितीन जाधव (वय ०६)
- वृंदा नितीन जाधव (वय ०४)
- नितीन जाधव (चालक)
- ऋषिकेश राजेंद्र शिंदे (वय २६)
- ऋतुजा राजेंद्र शिंदे (वय २३)
डंपर चालक विपूल थावरा दामोर (मूळ रा. राजस्थान) याला अपघातानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. रत्नागिरी पोलिसांकडून (Ratnagiri Police) या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे (Highway Accidents) प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे




