Marleshwar : संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर यात्रोत्सव सुरू
देवरुख : सह्याद्रीच्या कडेकपारीत मारळ नगरीत मार्लेश्वर (Marleshwar ) तीर्थक्षेत्री मकर संक्रांतीला होणारा यात्रा उत्सव सुरू झाला आहे. दि. १४ रोजी आंगवलीचा श्री देव मार्लेश्वर व साखरप्याची गिरीजा देवी यांचा कल्याणविधी सोहळा पार पडणार आहे.
या सोहळ्यासाठी मारळ नगरी सज्ज झाली आहे. भाविकांची पावले तीर्थक्षेत्री वळू लागली आहेत सह्याद्रीच्या कडेकपारीत स्वयंभू श्री देव मार्लेश्वर देवस्थान वसलेले आहे. मकरसंक्रांतीला श्री देव मार्लेश्वर व गिरीजा देवी यांचा कल्याणविधी सोहळा पार पडतो. याला शेकडो वर्षाची परंपरा आहे आंगवली मंदिराचे स्थान अनन्यसाधारण आहे. देवाचा चांदीचा मूळ टोप तेथेच असल्याने देवाच्या विवाहापूर्वीचे सर्व विधी आंगवली मंदिरात पार पडतात.
यावर्षीच्या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मार्लेश्वर तीर्थक्षेत्र विवाह तयारीला वेग आल्याचे दिसून येत उपस्थितीत सोमवारी रात्री देवाल हळद लावण्याचा कार्यक्रम पार पडला. रात्री कोकणचा साज संगमेश्वरी बाज हा बहारदार कार्यक्रम रंगला.





