महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज
MSRTC : ‘लाल परी’ची वसई ते रत्नागिरी अविरत सेवा!
जाणून घ्या संपूर्ण मार्ग आणि थांबे
- रत्नागिरी: कोकणातील प्रवाशांच्या सोयीसाठी रत्नागिरी ते वसई ही लांब पल्ल्याची एसटी (MSRTC) स ही जवळपास मागील दोन अडीच दशकांहून अधिक काळ अविरत सेवा बजावत आली आहे. वसई -विरारसह मुंबईच्या उपनगरात राहणाऱ्या कोकणवासीयांना ही लाल परी सोयीची ठरत आहे.
वसई आगार (पालघर विभाग) मार्फत चालवण्यात येणारी ही बस सेवा रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना थेट जोडते. यामुळे चाकरमानी आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महत्त्वाचा प्रवास मार्ग
ही बस रत्नागिरीतून सुटल्यानंतर मुंबई-गोवा महामार्ग आणि घोडबंदर रोड मार्गे वसईला पोहोचते. प्रवासाचे मुख्य टप्पे खालीलप्रमाणे आहेत:
- रत्नागिरी ते चिपळूण: मारुती मंदिर, हातखंबा फाटा, निवळी, बावनदी, संगमेश्वर, तुरळ, आरवली, असुर्डे, सावर्डे आणि चिपळूण (शिवाजी नगर बसस्थानक).
- चिपळूण ते पनवेल: भरणा नाका, पोलादपूर, महाड, लोणेरे फाटा, माणगाव, इंदापूर, वरसगाव, वाकण, नागोठणे, वडखळ, पेण (रामवाडी) आणि पनवेल.
- नवी मुंबई ते ठाणे: कामोठे, खारघर, कोकणभवन, नेरूळ, तुर्भे, रबाळे आणि ठाणे रेल्वे स्टेशन.
- ठाणे ते वसई (घोडबंदर रोड मार्गे): कापूरबावडी, मानपाडा, वाघबीळ, वडवली, ओवळा, गायमुख, देवाची डोंगरी, मालजीपाडा, कामन फाटा, जुचंद्र फाटा, सातीवली, तुंगारेश्वर, गोखिवरे आणि नवघर.
प्रवाशांसाठी वैशिष्ट्ये
- थेट कनेक्टिव्हिटी: रत्नागिरीतील ग्रामीण भागातील प्रवाशांना ठाणे आणि वसई-विरार परिसरात जाण्यासाठी ही बस अत्यंत सोयीची आहे.
- प्रमुख थांबे: महामार्गावरील सर्व महत्त्वाच्या फाट्यांवर आणि बसस्थानकांवर या बसला थांबा देण्यात आला आहे.
- सुरक्षित प्रवास: रा.प. वसई आगाराच्या अनुभवी चालकांमार्फत ही सेवा पुरवली जाते.





