रेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल
कोकणातून धावणारी निजामुद्दीन एक्सप्रेस उद्यापासून विजेवर धावणार
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणारी एर्नाकुलम ते हजरत निजामुद्दीन साप्ताहिक एक्सप्रेस (२२६५५/२२६५६) एरनाकुलम येथून दि.२५ जानेवारीच्या फेरीपासून तर दिल्लीतील हजरत निजामुद्दीन ते एर्नाकुलम दरम्यान धावताना ही गाडी 27 जानेवारीपासून विजेवर चालवली जाणार आहे.
कोकण रेल्वेमार्गे धावणारी एर्नाकुलम – ओखा एक्सप्रेस दिनांक 20 जानेवारीपासून विद्युत इंजिनवर धावू लागली आहे. याचबरोबर तिरुअनंतपुरम सेंट्रल ते वेरावल, नागरकोईल- गांधीधाम तसेच एर्नाकुलम ते निजामुद्दीन दरम्यान धावणारी नियमित एक्सप्रेस गाडी अशा चार एक्सप्रेस गाड्या आता विद्युत इंजिनसह चालवल्या जाणार आहेत.