महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजसायन्स & टेक्नॉलॉजी

AI Technology | रत्नागिरी पोलीस दल ‘एआय’ आधारित ॲपसह सज्ज!

रत्नागिरी : रत्नागिरी पोलीस दलाने आधुनिक व नाविन्यपूर्ण कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित “RAIDS – Ratnagiri Advanced Integrated Data System” हे अभिनव डिजिटल ॲप विकसित केले आहे. नागरिक-केंद्रित पोलीसिंग, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सार्वजनिक सुरक्षेच्या उद्देशाने तयार करण्यात आलेले हे ॲप मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली साकारले आहे.

रत्नागिरी पोलीस दलाने यापूर्वीही अनेक डिजिटल उपक्रम यशस्वीपणे राबवले असून, RAIDS ॲप हे त्याच दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण व भविष्यकालीन पाऊल आहे. या ॲपच्या माध्यमातून पोलीस व नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे.

RAIDS हे पूर्णपणे AI आधारित एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्म असून, पोलीस तपास, प्रतिबंधात्मक कारवाई व विश्लेषणात्मक कार्य अधिक वेगवान व सक्षम करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा अशा प्रकारे थेट पोलीसिंगमध्ये वापर करण्याचा हा प्रयोग भारतातील पहिल्यांदाच करण्यात येत असून, त्यामुळे गुन्हे अन्वेषणाला नवी दिशा मिळाली आहे.
RAIDS ॲपची प्रमुख वैशिष्ट्ये
1Dev-Drushti (AI इमेज इंटेलिजन्स प्रणाली): नापत्ता व्यक्ती, हिस्टरी शीटर्स, पाहिजे व फरार आरोपींचा शोध सुलभ करणारी प्रणाली. आरोपीच्या १८० वेगवेगळ्या AI जनरेटेड प्रतिमा तयार करता येतात, त्यामुळे वेशभूषा बदलली तरीही ओळख शक्य होते.
2.Dev-Rooprekha (AI स्केच व चेहरा पुनर्रचना प्रणाली): ओळख न पटलेल्या मृतदेहांचे संभाव्य चेहरारूप तयार करणे तसेच स्केचवरून हुबेहुब चेहरा जनरेट करणे शक्य होते.
3.BNS Analysis प्रणाली: गुन्ह्यानुसार भारतीय न्याय संहिता (BNS) मधील योग्य कलमे जलद व अचूकपणे शोधण्यास उपयुक्त.

4.GIS आधारित हिस्टरी शीटर्स मॉनिटरिंग: GIS तंत्रज्ञानाद्वारे हिस्टरी शीटर्सचे अचूक लोकेशन उपलब्ध करून देत प्रतिबंधात्मक कारवाई अधिक प्रभावी करते.
या प्रकल्पास मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून RAIDS ॲप यशस्वीपणे कार्यान्वित झाले आहे.
RAIDS ॲपमुळे रत्नागिरी पोलीस दलाने तंत्रज्ञानाधारित, स्मार्ट व भविष्यकालीन पोलीसिंगकडे एक ऐतिहासिक पाऊल उचलले असून, हा उपक्रम राज्य व देशातील इतर पोलीस दलांसाठी आदर्श ठरणार आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button