महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
गृह खात्याकडून लांजा विभागासाठी मोबाईल फॉरेन्सिक प्रकल्प व्हॅन

रत्नागिरी : भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत मोबाइल फॉरेन्सिक प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा विभागासाठी एक अत्याधुनिक मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन, प्रशिक्षित फॉरेन्सिक तज्ञासह, उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दि. 23/01/2026 रोजी सदर मोबाइल फॉरेन्सिक व्हॅनचे उद्घाटन मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय, रत्नागिरी येथे पार पडले.
या उद्घाटन प्रसंगी मा. पोलीस उपअधीक्षक(मुख्यालय) श्रीमती. राधिका फडके, पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.





