MEMU | चिपळूण- पनवेल मार्गावर उद्या धावणार मेमू स्पेशल ट्रेन!

रत्नागिरी/चिपळूण: २६ जानेवारी २०२६, प्रजासत्ताक दिनानिमित्त सलग सुट्ट्या आल्याने कोकणातून मुंबईकडे परतणाऱ्या आणि मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. ही गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वेने चिपळूण – पनवेल – चिपळूण (Train No. 01160 / 01159) दरम्यान विशेष ‘मेमू’ (MEMU) अनारक्षित गाडी चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
गाडीचे सविस्तर वेळापत्रक आणि मार्ग
ही विशेष गाडी पूर्णपणे अनारक्षित (Unreserved) असून प्रवाशांना जनरल तिकीट काढून यातून प्रवास करता येईल.
१. गाडी क्रमांक ०११६० (चिपळूण ते पनवेल स्पेशल):
- दिवस: २६ जानेवारी २०२६ (सोमवार)
- चिपळूण प्रस्थान: सकाळी ११:०५ वाजता.
- पनवेल आगमन: दुपारी १६:१० वाजता (त्याच दिवशी).
२. गाडी क्रमांक ०११५९ (पनवेल ते चिपळूण स्पेशल):
- दिवस: २६ जानेवारी २०२६ (सोमवार)
- पनवेल प्रस्थान: सायंकाळी १६:४० वाजता.
- चिपळूण आगमन: रात्री २१:५५ वाजता (त्याच दिवशी).
प्रमुख थांबे (Important Halts)
ही मेमू स्पेशल ट्रेन प्रवाशांच्या सोयीसाठी मार्गातील जवळपास सर्व महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे:
अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आपटा आणि सोमाटणे.
प्रवाशांसाठी महत्त्वाच्या बाबी:
- कोचची रचना: ही ८ डब्यांची मेमू (MEMU) ट्रेन आहे.
- तिकीट: ही ट्रेन अनारक्षित असल्याने याचे तिकीट रेल्वे स्थानकांवरील जनरल काउंटरवरून किंवा UTS ॲपद्वारे मिळवता येईल.
- फायदा: या गाडीमुळे विशेषतः चाकरमानी आणि विद्यार्थी वर्गाला ऐन सुट्ट्यांच्या काळात मोठा दिलासा मिळणार आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासादरम्यान अधिकृत तिकीट सोबत ठेवावे आणि गर्दी टाळण्यासाठी या विशेष मेमू सेवेचा लाभ घ्यावा.





