प्रा. डॉ. हन्नत शेख यांना व्यापार धोरण आणि प्रशासन विषयात पीएच. डी.

उरण (विठ्ठल ममताबादे ) : कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय, उरण रायगड येथील अकाउंट अँड फायनान्स विभागातील प्रा. हन्नत शेख यांना मुंबई विद्यापीठाच्या वतीने पीएच. डी. (विद्या वाचस्पती) प्रदान करण्यात आली. उरण महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.पि.आर.कारुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी व्यापार धोरण आणि प्रशासन या विषयातून मुंबई विद्यापीठाची (विद्या वाचस्पती) संशोधन पदवी (Ph.D.) पदवी प्राप्त केली आहे.
त्यांच्या संशोधनाचा विषय “An Analysis of Corporate Social Responsibility Activities of Companies with Special Reference to Raigad District”. रायगड जिल्ह्याच्या विशेष संदर्भात: कंपन्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी उपक्रमांचे विश्लेषण” होता.
उरण महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातील संशोधन केंद्रातून त्या पीएचडी प्राप्त प्रथम विद्यार्थिनी ठरल्या आहेत.
तसेच मार्गदर्शक म्हणून लाभलेले डॉ. पी. आर. कारुळकर यांच्याही त्या पीएचडी संशोधन करणाऱ्या प्रथम विद्यार्थिनी आहेत.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाल्मिक गर्जे, वडील युसुफ ताहीर शेख व आई मिनाज शेख, पती समिर अहमद, संस्थेचे अध्यक्ष तथा उपाध्यक्ष तसेच सर्व व्यवस्थापन समिती सदस्य, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.





